शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची 'बक्षिसी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:19 PM2019-06-18T13:19:02+5:302019-06-18T13:19:45+5:30

मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे.

lok sabha first session start budget deputy speaker post bjp non nda partners shivsena ysr congress patnaik | शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची 'बक्षिसी'?

शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची 'बक्षिसी'?

Next

नवी दिल्लीः मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे. याचदरम्यान मोदी सरकार स्वतःच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडणार आहे. यापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करावी लागते, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर एनडीएचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं दावा केला आहे. परंतु मोदी सरकार एनडीएच्या बाहेरच्या पक्षाला हे पद देऊ इच्छिते. शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.


तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपानं या पदासाठी वायएसआर काँग्रेसला ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आता नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाला हे पद मिळण्याची शक्यता आहे. भाजपा बीजेडीला हे पद देऊन ओडिशातला आपला प्रभाव वाढवण्याचा विचार करत आहे.

17व्या लोकसभेचे अध्यक्ष बनण्यासाठी ओम बिर्ला यांना शिवसेना (Shiv Sena), अकाली दल (Akali Dal), नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party), मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front), एलजेपी (Lok Janshakti Party), वायएसआर काँग्रेस (YSRCP), जेडीयू (Janta Dal United), अण्णा द्रमुक (AIADMK), अपना दल (APNA DAL)आणि बीजेडी (Biju Janata Dal) या 10 पक्षांनी समर्थन दिलं आहे. बीजेडीनं लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी दिलेल्या समर्थनाची परतफेड करण्यासाठीसुद्धा बीजेडीला लोकसभेचं उपाध्यक्षपद देण्यास भाजपा इच्छुक आहे.

 

Web Title: lok sabha first session start budget deputy speaker post bjp non nda partners shivsena ysr congress patnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.