शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
3
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
4
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
6
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
7
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
8
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
9
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
10
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
11
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
12
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
13
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
14
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
15
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
16
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!
17
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
18
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
19
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
20
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...

'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:40 IST

Lok Sabha Electon 2024: ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

 नवी दिल्ली - ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी म्हणजे तरुणांना पहिल्या नोकरीची गॅरंटी, शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी, प्रत्येक गरीब महिला करोडपती, मजुराला किमान ४०० रुपये प्रतिदिन, जात जनगणना, आर्थिक सर्वेक्षण आणि संविधान-नागरिकांचे अधिकार सुरक्षित’, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. 

भाजप म्हणजे बेरोजगारीची गॅरंटी, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, असुरक्षित आणि हक्कापासून वंचित महिला, असहाय आणि लाचार मजूर, वंचितांबरोबर भेदभाव आणि शोषण, हुकूमशाही आणि बेगडी लोकशाही असा दावाही त्यांनी केला. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, विचार करा, समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या, असे राहुल गांधी म्हणाले.

आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष : जयराम रमेशकोणत्याही किमतीत देणग्या मिळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांतून आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक रोखे योजना पुढे रेटण्यात आली, त्याची किंमत देशाने चुकवली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये केली. ३३ तोट्यात चाललेल्या कंपन्यांनी ५८२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले असून त्यातील ७५ टक्के भाजपला दिले, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात केलेल्या ‘रोड शो’ दरम्यान काँग्रेसने भाजपला घाबरून त्यांचे आणि सहकारी पक्ष आययूएमएलचे झेंडे दाखवले नाहीत. गांधींकडे स्वतःच्या पक्षाचा झेंडा जाहीरपणे दाखविण्याचे धैर्य नाही. त्यांना इंडियन युनियन मुस्लीम लीगची (आययूएमएल) मते हवी आहेत, परंतु त्यासाठी त्यांना त्यांचा झेंडा महत्त्वाचा वाटत नाही. - पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

राहुल गांधी यांनी मित्रपक्ष आययूएमएलचे झेंडे रोड शो दरम्यान दाखवले नाहीत. त्यांना त्यांचा संकोच वाटत असल्याचे दिसते. तसे असेल तर त्यांनी इंडियन युनियन मुस्लीम लीगचा पाठिंबा नाकारला पाहिजे. काँग्रेसने बंदी घातलेल्या पीएफआय राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा स्वीकारल्याचा धक्का बसला आहे.- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री 

काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींवर विश्वास उडाल्यामुळे त्यांना पक्षांतर करण्यास भाग पडत आहे. राहुल गांधी त्यांचे राजकीय विचार पटवून देण्यात अपयशी ठरत आहेत. - सुधांशू त्रिवेदी, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस