शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 6:15 AM

द्रमुक प्रबळ, पण युवा नेत्यांचेही कनिमाेझी यांना तगडे आव्हान

असिफ कुरणे, लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : द्रमुक पक्षाच्या उप महासचिव  व माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या कनिमोझी या दुसऱ्यांदा तुतुकोडी मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. यावेळी अण्णाद्रमूकचे युवा नेता शिवसामी वेलुमणी आणि तामिळ मनिला काँग्रेसच्या एसडीआर विजयासीलन यांचे तगडे आव्हान कनिमोझी यांच्यासमोर आहे.  राष्ट्रीय मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्दे देखील प्रचारात महत्त्वाचे ठरत आहेत.

मतदारसंघात नाडर, दलित, मुकूलथोरस, मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. शिवसामी वेलुमणि आणि विजयासीलन सारख्या युवा नेत्यांनी कनिमोझी यांना प्रचारासाठी फिरण्याची वेळ आणली आहे.   पुरामुळे झालेले नुकसान, पायाभूत सुविधांची दुरावस्था , पिण्याचे स्वच्छ पाणी अशा गोष्टींची ग्रामीण भागात  समस्या आहे. तर शहरी भागात प्रदूषण कळीचा मुद्दा आहे.   

२०१९ व २०२१च्या निवडणुकीत स्टरलाईट प्रकल्पाचा मुद्दा कळीचा विषय होता. या प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनावेळी पोलिस गोळीबारात १३ आंदोलकांचा बळी गेला होता. पण आता हा मुद्दा पूर्णपणे थंड्या बस्त्यात गेल्यासारखी स्थिती आहे. पण त्यावरून राजकारण आजही सुरु आहे. 

निवडणुकीत कळीचे मुद्दे 

  • गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या पुराचा फटका या मतदारसंघातील अनेक गावांना बसला होता.  अनेक कुटुंबियांना आपला निवारा गमवावा लागला होता. मात्र सरकारकडून पुर्नवसन, मदत झाली नाही याबाबत नाराजी. 
  • तुतुकोडी येथील फर्निचर पार्क आणि कन्याकुमारीतील विमानतळाचे विस्तारीकरण लवकर व्हावे अशी येथील मतदारांची मागणी आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणाचा विषय देखील ऐरणीवर आहे.
  • मतदारसंघात औद्योगिककरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. पण स्थानिकांना रोजगार वाढवणारे अत्याधुनिक मॉर्डन उद्योग जिल्ह्यात यावे असे वाटते. 

एकूण मतदार    १४,४८,१७९पुरुष - ७,०८,२४४महिला - ७,३९,७२०

२०१९ मध्ये काय घडले?कनिमोझी करुणानिधी द्रमूक (विजयी) ५,६३,१४३ तामिलसाई सुंदरराजन भाजप २,१५,९३४  

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     २०१४    जे. नट्टरजी        अण्णाद्रमूक    ३,६६,०५२२००९    एस. जयादुराई    द्रमूक    ३,११,०१७

टॅग्स :Chennaiचेन्नईlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४