शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 17:13 IST

Yusuf Pathan : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात आहे. तो पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात नामांकित चेहरा देऊन तृणमूल काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. युसूफच्या प्रचारासाठी त्याचा भाऊ इरफान पठाण मैदानात उतरला आहे. त्याने आपल्या भावाच्या विजयासाठी रॅली काढत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. 

जेव्हा कुणी क्रिकेटर अथवा कलाकार निवडणुकीच्या मैदानात उतरतो तेव्हा त्याचा वेगळा प्रभाव असतो. युसूफ पठाण क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव आहे परंतु त्याच्यासमोर अधीर रंजन चौधरी यांचे तगडे आव्हान आहे. बहरामपूरमधील जातीय समीकरण पाहता युसूफ विजयी होण्याची शक्यता टीएमसीला वाटते. जर मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान युसूफच्या पारड्यात टाकले तर अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे कठीण होईल. त्यातून युसूफ पठाणच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. भाजपाने या जागेवर डॉ. निर्मलकुमार साहा यांना मैदानात उतरवले आहे. 

भावासाठी भाऊ मैदानात!

जर आपण विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले तर, बहरामपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. 

बहरामपूर मतदारसंघातील जातीय समीकरणबहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Trinamool Congressतृणमूल काँग्रेसYusuf Pathanयुसुफ पठाणirfan pathanइरफान पठाणwest bengalपश्चिम बंगाल