शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:30 IST

Lok Sabha Elections 2024 : माधवी लता यांनी, 13 मेरोजी हैदराबादमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी AIMIM प्रमुख ओवेसी यांना इशाराही दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता 1 जूनला सातव्या अर्थात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणा र आहे. मात्र, या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हैदराबादमध्ये झालेल्या मतदानासंदर्भात बोलताना, आपल्या मतदारसंघाता मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले आहे, असा दावा भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी केला आहे. त्या एबीपी न्यूजसोबत बोलत होत्या. 

बोगस मतदानाचा दावा - माधवी लता यांनी, 13 मेरोजी हैदराबादमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी AIMIM प्रमुख ओवेसी यांना इशाराही दिला आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना इशारा देताना माधवी म्हणाल्या, "4 जूनला निकाल पाहू, मग मी सोडणार नाही." एवढेच नाही, तर "याला (ओवेसी) तर तडीपार करायला हवे. येथे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले आहे आणि बोगस मतदान करून जिंकण्यात काय मोठेपणा?" असेही माधवी म्हणाल्या.

एफआयआर दाखल करणारी महिलाच बोगस मतदार - माधवी म्हणाल्या, ज्या महिलेने आपल्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे, ती महिला स्वतःच एक बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. मी तिच्या घरचा पत्ता आणि प्रमाणपत्र शोधून काढले आहे. ते घर तिचे नाहीच. या शिवाय, अल्पसंख्याकांच्या बूथवर अधिकचे मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला. हिंदू राहत असलेल्या भागांतील मतदान सायंकाळी ७ वाजताच बंद करण्यात आले. मग अल्पसंख्यकांच्या बुथवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान कसे सुरू होते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

माधवी लता यांनी दावा केला आहे की, या वेळी तब्बल 2.30 लाख मते अधिकची पडली आहेत. यात रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कुणाला माहीत किती मते पडली असतील? 

महिलांचे हिजाब वर करून तपासली होती ओळख - तत्पूर्वी, हैदराबाद लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यावेळी, सकाळच्या सुमारास भाजप उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम महिलांची हिजाब वर करून ओळख तपासतानाही दिसल्या हत्या.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madhavi lathaवि. के. माधवी लता