शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 07:10 IST

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागातील प्रचार दुपारी तीन वाजता थांबला. २१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपैकी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १०२ मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

याशिवाय सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. या टप्प्यासाठी २० मार्च रोजी अधिसूचना निघाली होती. ३० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर एकूण १६२५ उमेदवार रिंगणात राहिले. देशातील प्रमुख मतदारसंघाचा समावेश असलेल्या या टप्प्यात देशभरात प्रचाराचा धुराळा उडाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवारासह त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यग्र होते.

मोदी की गॅरंटी विरुद्ध न्यायपत्रप्रचारादरम्यान भाजपकडून 'मोदी की गॅरंटी', तर कॉंग्रेसकडून 'न्याय पत्र' या नावाने जाहीरनामा मतदारांपुढे मांडण्यात आला. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता, एक देश, एक निवडणुकीचा आश्वासन देण्यात आले, तर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात पाच न्यायांसह २५ गॅरंटींचे आश्वासन देण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील राजनिहाय मतदारसंघअरुणाचल प्रदेश २, आसाम ५, बिहार ४, छत्तीसगड १, मध्य प्रदेश ६महाराष्ट्र ५, मणिपूर २, मेघालय २, मिझोराम १, नागालँड १, राजस्थान १२, सिक्कीम १, तामिळनाडू ३९ उत्तर प्रदेश ८, उत्तराखंड ५, पश्चिम बंगाल ३, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर १, लक्षद्वीप १, पुदुचेरी १.

राज्यातील या मतदार संघांचा समावेशनागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

रिंगणात आठ मंत्री -  नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्वांनंद सोनोवाल, संजीव बलियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, एल. मुरुगन

दोन माजी मुख्यमंत्री : बिप्लव कुमार देब (त्रिपुरा), नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) माजी राज्यपाल - टी. सौंदरराजन

प्रमुख नेत्यांच्या राज्यातील सभापंतप्रधान नरेंद्र मोदी :    चंद्रपूर व कन्हान, गृहमंत्री अमित शाह : साकोली (भंडारा), राहुल गांधी :    साकोली (भंडारा), मल्लिकार्जुन खरगे : नागपूरएकनाथ शिंदे : काटोल, सावनेर, उमेरडदेवेंद्र फडणवीस : पाचही मतदारसंघयोगी आदित्यनाथ : नागपूर, भंडारामायावती : नागपूरकन्हैया कुमार : रामटेक, चंद्रपूरअभिनेते गोविंदा : रामटेक

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरी