शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; आज फायनल होणार उमेदवारांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 22:02 IST

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक झाली.

Congress Election Committee  Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (7 मार्च) राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत 10 राज्यांतील 60 लोकसभा जागांवर चर्चा झाली. ईशान्येकडील राज्यातील जागांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान्येकडील ज्या पाच जागांबाबत निर्णय झाला आहे, त्यात मेघालयातील दोन, मणिपूरमधील दोन, सिक्कीममधील एक, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या सर्वांवरील उमेदवारांची नावे पक्षाकडून निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, काँग्रेसचे दक्षिण भारतावर विशेष लक्ष असल्यामुळे तेथील उमेदवारांबाबतही लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या 10 राज्यांसाठी 60 उमेदवारांच्या नावांवर निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या दहा राज्यांमध्ये दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या जागेचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील जागावाटपाबाबत काँग्रेसला अद्याप अंतिम तोडगा काढता आलेला नाही. पण, लवकरच येथील जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

यूपीमध्ये आघाडीबाबत चर्चेला उशीर झाल्यामुळे अमेठी आणि रायबरेलीबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या दोन जागांवर राहुल आणि प्रियंका गांधी लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीतील आघाडीचा निर्णय झाल्यामुळे येथील तीन उमेदवार आज निश्चित होणार आहेत. तिकडे, त्रिपुरामध्ये सीपीएम इंडिया आघाडीचा भाग असल्यामुळे काँग्रेसने सीपीएमला एक जागा दिली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण