शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:51 IST

...म्हणून आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Arvind Kejriwal On Congress: लोकसभा निवडणूक (Lok Sabhe Election) अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या अन् शेवटचा टप्प्यातील मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंडिया आघाडीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, "आम आदमी पक्षाचा काँग्रेससोबत कायमचा संबंध नाही. आम्ही काय लग्न केले नाही. देश वाचवण्यासाठी 4 जूनपर्यंत आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपला पराभूत करणे आणि सध्याच्या हुकूमशाही आणि गुंडगिरीला संपवणे, हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे." 

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये युती का नाही?दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती आहे, पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यावर केजरीवाल म्हणाले, "देश वाचवणे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज होती, तिथे आप आणि काँग्रेसने एकत्र येऊन उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही."

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीदिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेले अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “माझे तुरुंगात परत जाणे हा मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. ते मला हवं तोपर्यंत तुरुंगात ठेवू शकतात, पण मी घाबरत नाही. केवळ भाजपच्या सांगण्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल