शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 13:55 IST

दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे.

ठळक मुद्देदिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. 'भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'

भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून भाजपाने कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. दरम्यान भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. 

दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा यांनी 'भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही' असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत. 

भोपाळमध्ये सहाव्या टप्प्यासाठी रविवारी (12 मे) रोजी मतदान होणार आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ भोपाळमध्ये एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बाबांकडे या रॅलीची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रोड शोमध्ये जवळपास सात हजार साधू-संत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजपा आणि हिंदुत्ववाद्यांची ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे. 

दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की, ''आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.' दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देताना महाराजांनी मोठी प्रतिज्ञाही केली. ''येत्या 5 मे रोजी  कामाख्या मातेचा महायज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञात पाच क्विंटल मिरचीची आहुती देण्यात येईल. मात्र या यज्ञादरम्यान कुणालाही ठसका लागणार नाही. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह यांचा विजय होईल. तसेच दुर्दैवाने असे झाले नाही तर मी महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज त्याच ठिकाणी जिवंत समाधी घेईन, ही माझी प्रतिज्ञा आहे,''असेही महाराजांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी