शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 12:23 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही लगावला आहे. 

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनीपश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

'कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर मोदी बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. जनतेच्या न्यायालयात त्यांना दंडित केले जाईल' असे ममता बॅनर्जी यांनी मोदींविषयी प्रश्न विचारल्यावर म्हटलं आहे.

'मला माहीत आहे की, त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच 42 जागांवरुन निवडणूक लढवावी' असं ही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 'बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली' ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसेच 'कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे' असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. ममता बॅनर्जी यांनी 'मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्यांच्यावरच उलटणार असल्याचं म्हटलं होतं. 

'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला होता. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक