शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता परेश रावल यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 13:59 IST

परेश रावल यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गांधीनगर - भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, परेश रावल यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून परेश रावल भाजपाच्या तिकीटावर लढले होते. याठिकाणी परेश रावल यांनी काँग्रेसचे उमेदवार हिंमतसिंह पटेल यांना 3 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं होतं. 

मागील 2014 च्या निवडणुकीत अभिनेता परेश रावल यांना 6 लाख 33 हजार 582 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या हिंमतसिंह यांना 3 लाख 6 हजार 949 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. मागील दहा वर्षापासून अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. 

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 184 उमेदवारांची नावे होती, दुसऱ्या यादीत 1 नावाचा समावेश होता. तर शुक्रवारी मध्यरात्री भाजपाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये आंध्र प्रदेशमधील 23, महाराष्ट्रातील 6, ओडीशामधील 5 तर मेघालय आणि आसाममधील प्रत्येकी एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. याआधीही भाजपाच्या केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं आहे. 

 

भाजपाची दुसरी यादी जाहीर, पुरीतून संबित पात्रा यांना उमेदवारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकParesh Rawalपरेश रावलBJPभाजपाGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी