शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 14:18 IST

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत

अहमदाबाद - काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये होत असलेल्या काँग्रेस  कार्यकारणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होतंय. या बैठकीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर विशेष चर्चा केली जाणार आहे. 

 

निवडणूक प्रचार करताना विरोधकांकडून नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला कसा फटका बसला, नोटाबंदीचा सर्वाधित फटका व्यापारांना बसल्यामुळे गुजरातमध्ये नोटाबंदीच्या निर्णय हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो. नोटाबंदी निर्णयाचा विरोधाचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारणी बैठकीत मांडला जाणार असून त्याचसोबत जीएसटी, शेतकऱ्यांची अवस्था, बेरोजगारी असे विविध मुद्दे काँग्रेस कार्यकारणीत बैठकीत चर्चा केली जाईल.

 

काँग्रेस कार्यकारणी समिती बैठकीच्या एक दिवसआधीच गुजरातमधील जामनगर(ग्रामीण) भागाचे काँग्रेस आमदार वल्लभ धारविया यांनी आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. मागील तीन दिवसांमध्ये तीन आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. 2017 पासून आत्तापर्यंत काँग्रेसच्या 5 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर एका काँग्रेस आमदाराची नियुक्ती निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या 77 वरुन 71 पर्यंत पोहचली आहे.   

पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल करणार काँग्रेसमध्ये प्रवेश मागील काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू होती या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: हार्दिक पटेल यांनी राहूल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. जामनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून हार्दिक पटेल निवडणूक लढू शकतात. 

पंतप्रधान व भाजपा अध्यक्ष यांच्या राज्यातून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काँग्रेसच्या बैठकीत ठरणार असून 1961 नंतर पहिल्यांदा काँग्रेसची कार्यकारणी बैठक गुजरातमध्ये होत आहे. 1961 मध्ये गुजरातच्या भावनगरमध्ये ही बैठक झाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी