शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

आप-काँग्रेस आघाडीची पुन्हा चर्चा ? काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:40 IST

दिल्ली काँग्रेसमध्ये आपसोबत आघाडीवरुन दोन गट पडलेत, त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पडलेले आहेत

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सगळेच पक्ष प्रचाराला लागले आहेत. मात्र दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या सर्व हालचाली थंड पडल्या आहेत. दिल्ली काँग्रेसमध्येआपसोबत आघाडीवरुन दोन गट पडलेत, त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पडलेले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत प्रचार करावा की नाही असा संभ्रम निर्माण झालाय.मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा आप-काँग्रेस यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरु झाली. कदाचित आज नाही तर उद्या याबाबतची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. 

आम आदमी पार्टीने रविवारी दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करुन दिल्लीत आप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिलेत. मात्र काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला घेऊन अद्याप कोणतीच हालचाल सुरु केली नाही. काँग्रेसने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. 

दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांनी आपसोबत आघाडी होण्याला आधीच विरोध केला आहे तर दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पीसी चाको यांनी आपसोबत कांग्रेसची आघाडी व्हावी असा मानसिकतेत आहे. आपबरोबर आघाडी करावी की नाही यासाठी जिल्हा अध्यक्षांकडून मते मागवण्यात येत आहेत. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर प्रचार कधी सुरु करणार असा प्रश्न उभा राहिला आहे. 

रविवारी दिल्ली काँग्रेस प्रभारी पीसी चाको यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चाको यांनी आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली. मात्र राहुल गांधी यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही तरीही पुढील एक-दोन दिवसात आघाडीबाबत चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पक्षातील एका गटाला वाटत आहे. 

मात्र काँग्रेसच्या या गदारोळात आम आदमी पक्षाने सातही लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी सहा महिन्यांपूर्वी 6 लोकसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले होते. मागील सहा महिन्यांपासून हे उमेदवार निवडणुकीच्या प्रचाराला लागलेत. आम आदमी पक्षाच्या निवडणूक समितीने निश्चित केल्यानंतर सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आम आदमी पार्टीने काँग्रेससोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून काँग्रेसकडून मिळणारा प्रतिसाद थंड होता. काँग्रेस दिल्लीत एकटे लढून एकप्रकारे भाजपला मदत करतंय असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी केला. 

आम आदमी पक्षाच्या सात उमेदवारांची यादी चांदनी चौक -पंकज गुप्तापूर्व दिल्ली - आतिशीउत्तर-पूर्व - दिलीप पांडेनवी दिल्ली - बृजेश गोयलदक्षिण दिल्ली - राघव चड्ढाउत्तर-पश्चिम - गुगन सिंहपश्चिम दिल्ली - बलबीर सिंह जाखडा 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल