शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 21:18 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

Lok sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या, 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत देशाची सत्ता कुणाच्या हातात जाणार, हे स्पष्ट होईल. निवडणूक आयोगानेही मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. मत मोजणीवेळी काही गडबड आढळल्यास त्या नंबरवर व्हिडिओ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात एक मोठी कायदेशीर टीमही स्थापन करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले की, ही जनतेची निवडणूक आहे. गेल्या काही आठवड्यांत भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, संविधान बदलण्याचा आणि भारतीय लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या भ्रष्ट वर्तनामुळेच आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मतमोजणीदरम्यान घराबाहेर पडण्याचे आवाहन करतआहोत. 

दिल्लीत देखरेख केंद्र सुरू आम्ही प्रदेश प्रभारींना विनंती करतो की, त्यांनी काँग्रेस कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी मतमोजणीत अडचण येत आहे, अशा ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी. आम्ही दिल्लीत एक देखरेख केंद्र सुरू केले आहे, जे 24 तास पूर्णवेळ काम करेल. मतमोजणी केंद्रावर काही संशयास्पद घडत आहे, असे तुम्हाला वाटल्यास, ते तुमच्या फोनवर रेकॉर्ड करा आणि आमच्या हेल्पलाइन नंबरवर त्वरित पाठवा. अशा कोणत्याही घटनेवर आवश्यक कारवाई करण्यासाठी आम्ही एक मोठी कायदेशीर टीम तयार केली आहे. मतमोजणी केंद्र आणि लोकसभा मतदारसंघाचे नाव व्हिडिओसह पाठवा, असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेस