शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 20:32 IST

Lok Sabha Election Result 2024: आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश आले आहे.

आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिले, अशा शब्दात उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या बंपर यशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या निकालाबाबत माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की, सर्वसामान्य माणसाने आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते हे दाखवून दिलेलं आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिले आहे, त्यासाठी मी सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करतो.  सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हेच मतदारांनी लोकांना दाखवून दिले आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

दरम्यान, आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी २९ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. तर महायुती १८ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने ९ जागा जिंकून आपला जनाधार कायम असल्याचे दिसून आले आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे