शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 09:37 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : गेल्या काही निवडणुकांबाबतचे एक्झिट पाेल किती खरे ठरले, काेणाचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास हाेते? याबाबत घेतलेला आढावा.

नवी दिल्ली : देशातील लाेकसभा निवडणुकीचे मतदान अखेर संपले. मतदान संपल्यानंतर काही वेळातच ‘एक्झिट पाेल’चे आकडे समाेर आले. या आकड्यांवर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘एक्झिट पाेल’ किती खरे ठरतात? हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीनंतर विचारला जाताे. गेल्या काही निवडणुकांबाबतचे एक्झिट पाेल किती खरे ठरले, काेणाचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास हाेते? याबाबत घेतलेला आढावा.

२०१९ही निवडणूक म्हणजे माेदी सरकारची पहिली परीक्षा हाेती. यावेळी ‘एक्झिट पाेल’ने ‘एनडीए’चे सरकार पुन्हा स्थापन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करताना एनडीएला सरासरी ३०६, तर यूपीएला सरासरी १२० जागा दिल्या हाेत्या. मात्र, प्रत्यक्ष निकालात बराच फरक पडला.    संस्था    एनडीए    यूपीए    न्यूज२४-चाणक्य    ३५०    ९५     सीव्हाेटर    २८७    १२८     इंडिया टुडे-ॲक्सिस    ३५२    ९३     एबीपी-सीएसडीएस    २७७    १३०    इंडिया टीव्ही-सीएनएक्स    ३००    १२०    सरासरी    ३०६    १२०     प्रत्यक्ष निकाल    ३५३    ९३

२०१४यावेळी जवळपास सर्वच ‘एक्झिट पाेल’मधून ‘एनडीए’ची सत्ता स्थापन हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. त्यावेळी एनडीएला सरासरी २८३ जागा, तर यूपीएला १०५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. मात्र, माेदी लाटेमध्ये यापेक्षा जास्त यश एनडीएला मिळाले.    संस्था    एनडीए    यूपीए    न्यूज२४-चाणक्य    ३४०    ७०     इंडिया टीव्ही-सीव्हाेटर    २८९    १०१     सीएनएन-सीएसडीएस    २८०    ९७     एबीपी-नेल्सन    २७४    ९७    ओआरजी    २४९    १४८    सरासरी    २८३    १०५    प्रत्यक्ष निकाल    ३३६    ६०    

२००९ही निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वातील सत्ताधारी यूपीए सरकारची पहिली परीक्षा हाेती. त्यावेळी एक्झिट पाेलने यूपीएला १९५ आणि एनडीएला १८५ जागा दिल्या हाेत्या. चुरशीची लढत हाेणार असल्याचा हा अंदाज हाेता. झालेही तसेच प्रत्यक्षात यूपीएला बहुमत मिळाले नव्हते. इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर यूपीएचे सरकार स्थापन झाले.    संस्था    एनडीए    यूपीए    स्टार-नील्सन    १९६    १९९    सीएनएन    १७५    १९५     सी-व्हाेटर    १८९    १९५     हेडलाइन्स टुडे    १८०    १९१     सरासरी    १८५    १९५    प्रत्यक्ष निकाल    १५९    २६२

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी