शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लोकसभा निवडणूक; काँग्रेसचे मिशन ३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:32 IST

कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींना सर्वाधिकार

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेतेपी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला.या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.शोषित-पीडितांसाठी काँग्रेसने लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या बैठकीत केले, तर मोदी सरकारचे आता रिव्हर्स काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. नरेंद्र मोदी निराश आहेत. तसे त्यांच्या शब्दबंबाळ भाषणांतूनही दिसून येत आहे, असेही त्या म्हणाल्या.दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब, विविध यंत्रणा व घटनात्मक संस्था यांच्यावर भाजपा पद्धतशीरपणे हल्ले चढवत आहे, असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसच हा भारताचा खरा आवाज (व्हॉइस आॅफ इंडिया) आहे. पक्षाच्या मतदारांचा पाया विस्तारणे हे आपल्यापुढील महत्त्वाचे लक्ष्य आहे. ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मते दिली नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचा विश्वास संपादन करा, असा संदेशही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.जुमले रचण्यात मोदी दंगमोदी आत्मस्तुती व निवडणूक जुमले रचण्यात कायम दंग असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवण्याच्या मोदी यांच्या दाव्याचा फोलपणा दाखवून देताना ते म्हणाले की, त्यासाठी कृषी क्षेत्राचा दर १४ टक्के हवा. पण तो दृष्टिक्षेपातच नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLoksabhaलोकसभा