शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 20:18 IST

...या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडले. पण, नागालँडमध्ये एक विचित्र स्थिती बघायला मिळाली. येथील 6 जिल्ह्यांमध्ये आज शून्य मतदानाची नोंद झाली. याचे कारण म्हणजे, ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ईएनपीओ) नावाची संघटना. ही संघटना राज्यात अधिक आर्थिक स्वायत्ततेसह राज्यात स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहे. या संघटनेने निवडणुकीपूर्वी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, याचा परिणाम आज झालेल्या मतदानावर दिसून आला.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितला उत्तर -नागालँडमध्ये लोकांना मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल, ईशान्येकडील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ENPO ला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. आपल्या नोटीशीत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यामागचे कारण विचारले आहे. तसेच, योग्य उत्तर न मिळाल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.

'कुणालाही जबरदस्ती केली नाही' -या नोटिशीला ENPO ने देखील उत्तर दिले आहे. हा लोकांचा ऐच्छिक निर्णय होता. यासाठी कुणालाही जबरदस्ती करण्या आली नाही. असे करणे गुन्हा नाही. यामुळे निवडणूक आयोगाचे कलम 171 सी यासाठी लागू होत नाही. तसेच, बहुदा आयोगाचा काही गैरसमज झाला असावा आणि आपण या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाला सहकार्य करण्यास तयार आहोत. असेही संघटनेने म्हटले आहे.

ENPO नं आमदारांसोबत केली होती बैठक - ENPO ने आपल्या मागण्यांना घेऊन 30 मार्चला ईस्टर्न नागालँड एमएलए असोसिएशनसोबत दीर्घकाळ बंद दाराआड चर्चा केली होती. या बैठकीत असोसिएशनचे सर्व 20 आमदार उपस्थित होते. यावेळी संघटनेने लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चारही केला होता. यावर संबंधित आमदारांनी या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन त्यांना केले होते. मात्र ENPO ने ऐकले नाही. आमदारांसोबतच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ENPO ने निवडणूक आयोगालाही आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूकnagaland lok sabha election 2024नागालँड लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग