शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 09:03 IST

या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा शनिवारी (दि. १ जून) पार पडणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. यावेळीची निवडणूक प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडी यांच्यात झाली.

उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीतील सदस्य समाजवादी पार्टी, काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेसचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये ‘जुने विरुद्ध नवीन’ सत्तासंघर्ष दिसून येणार आहे. पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल १९९६ नंतर प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर इंडिया आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि आप यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • नरेंद्र माेदी - भाजप - वाराणसी - उत्तर प्रदेश
  • रविशंकर प्रसाद - पक्ष : भाजप - पाटणा साहिब - राज्य : बिहार
  • अनुराग ठाकूर - भाजप - हमीरपूर - हिमाचल प्रदेश
  • अभिषेक बॅनर्जी - तृणमूल काँग्रेस - डायमंड हार्बर - प. बंगाल
  • रवि किशन - भाजप - गाेरखपूर - उत्तर प्रदेश
  • कंगना रणौत - भाजप - मंडी - हिमाचल प्रदेश

सायंकाळी साडेसहानंतर येणार ‘एक्झिट पोल’निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वेबसाईट १ जून रोजी संध्याकाळी ६:३० नंतर ‘एक्झिट पोल’ची आकडेवारी प्रसिद्ध करू शकतील. 

  • काेणी किती जागा लढविल्या?

भाजप     ४४१काँग्रेस     ३१८सपा     ६२तृणमूल काँग्रेस     ४७आरजेडी     २४डीएमके     २१उद्धवसेना     २१

२५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

वाराणसी/पाटणा : उत्तर भारतातील तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान युपी आणि बिहारमध्ये २५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १३, साेनभद्र येथे २ तर बिहारमधील भाेजपूर येथे ५, राेहतास येथे ३ आणि कैमूर व औरंगाबादमध्ये प्रत्येक एक कर्मचारी दगावला. या सर्वांना तीव्र ताप, उच्च रक्तदाब आणि वाढलेली रक्त शर्करा अशी लक्षणे हाेती. बिहारमध्ये गेल्या दाेन दिवसांत २४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौतRavi Kishanरवी किशनvaranasi-pcवाराणसी