शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका समोशासाठी कुठे 15, तर कुठे 7.50 रुपये माेजा; लस्सी अन् लिंबू पाण्याचेही दर ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:18 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणूक प्रचारात उमेदवाराने प्रत्येक खाद्यपदार्थांवर किती रुपये खर्च करावेत, हे जिल्हा निवडणूक पॅनेल ठरवत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवारांना पक्षकार्यकर्ते, नेते यांना नाश्ता, जेवण आदी गोष्टी द्याव्या लागतात. त्यासाठी खर्चाची मर्यादा विविध जिल्ह्यांतील निवडणूक पॅनेलने ठरवून दिली असून त्यातील विविध खाद्यपदार्थांचे दर वेगवेगळे आहेत. पंजाब जालंधरमधील उमेदवार चहा, समोसासाठी प्रत्येकी १५ रुपये उमेदवाराला खर्च करता येतील, तर मध्य प्रदेशमध्ये चहा, समोसासाठी अनुक्रमे ७ रुपये व ७ रुपये ५० पैसे असा दर निवडणूक पॅनेलने निश्चित केली आहे. 

लोकसभेच्या निवडणूक प्रचारात उमेदवाराने प्रत्येक खाद्यपदार्थांवर किती रुपये खर्च करावेत, हे जिल्हा निवडणूक पॅनेल ठरवत आहे. जालंधरमध्ये छोले भटुरेसाठी ४० रुपये किंमत जिल्हा निवडणूक पॅनेलने निश्चित केली आहे. उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या हिशेबात याच किमती नमूद कराव्या लागणार आहेत. मिठाईपैकी धोधा (प्रतिकिलो ४५० रुपये), घी पिन्नी (प्रतिकिलो ३०० रुपये), लस्सी व लिंबू पाणी प्रत्येकी अनुक्रमे २० रुपये, १५ रुपये अशा आकारण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चहाचा दर सर्वांत कमी म्हणजे ५ रुपये ठरविण्यात आला आहे. तेथील जिल्हा निवडणूक पॅनेलने इडली, सांबार वडा, पोहा-जिलेबी यांचा दर प्रत्येकी २० रुपये, डोसा, उपमाचा दर प्रत्येकी ३० रुपये ठरविला आहे. मणिपूर येथील थौबल जिल्ह्यात चहा, समोसा, कचोरी, खजूर आदींचा दर प्रत्येकी १० रुपये निश्चित करण्यात आला आहे. 

हेलिपॅड, प्रचाराच्या वाहनापर्यंतचे भाडे ठरलेलोकसभा, विधानसभा निवडणुकांकरिता जिल्हा निवडणूक पॅनेलने हेलिपॅड, लक्झरी वाहने, फार्म हाऊस, फुले, कूलर, टॉवर एसी, सोफा आदींचे दरही ठरवून दिले आहेत. यातील काही गोष्टी भाड्याने घ्याव्या लागतील किंवा फुलांसारख्या गोष्टी खरेदी कराव्या लागणार आहेत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टाटा सफारी किंवा स्कॉर्पिओ, होंडा सिटी, सियाझ, बस, बोट यांचेही भाडे निवडणूक पॅनेलने निश्चित केले आहे. त्यानुसारच उमेदवाराला निवडणूक खर्चात हिशेब द्यावा लागेल. पुष्पगुच्छ, गुलाबाच्या, झेंडूच्या फुलांच्या हारांचे दरही वेगवेगळे आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४