शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:09 IST

Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे.

Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या मतदानानंतर आता निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी सुरू झाली. त्यानंतर आता ईव्हीएमच्या मतांची मोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. देशात एनडीए सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की, इंडिया आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालातील सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने मोठी झेप घेतली असून, इंडिया आघाडी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांनुसार २५० जागांवर एनडीए पुढे आहे. तर इंडिया आघाडी १०० जागांवर पुढे आहे. हे सुरुवातीचे कल असून, ते वेगाने बदलताना दिसत आहेत. गांधीनगर येथून भाजपा उमेदवार अमित शाह ३५ हजार मतांनी पुढे आहेत. तर गया मतदारसंघातून जीतन राम मांझी पुढे आहेत. कंगना राणौत मंडी येथून आघाडीवर आहे. जालंधर मतदारसंघातून काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी पुढे आहेत. पाटणा साहिबमधून रविशंकर प्रसाद पुढे आहेत. आतापर्यंत एकूण ३७१ पेक्षा जागांचे कल आले असून, त्यात भाजप २५० जागांवर पुढे आहे. इंडिया आघाडी १३५ जागांवर पुढे आहे.

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आघाडीवर

वाराणसीमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. गोरखपूर विधानसभेत भाजपाचे रवी किशन आघाडीवर आहेत. फतेहपूरमध्ये भाजपाच्या साध्वी निरंजन ज्योती पोस्टल बॅलेटमध्ये आघाडीवर आहेत. दिल्ली ईशान्य मतदारसंघातून भाजपाचे मनोज तिवारी पुढे आहेत. तिरुअनंतपुरम जागेवर शशी थरूर मागे आहेत. भाजपाचे राजीव चंद्रशेखर पुढे आहेत. रायबरेलीत पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी पुढे आहेत. केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी १०३ मतांनी पुढे आहेत.

गुनामध्ये भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया पुढे आहेत. अखिलेश यादव कन्नौजमधून पुढे आहेत. कर्नाल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मनोहर लाल खट्टर पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. भाजपा १७ जागांवर तर टीएमसी १८ जागांवर आघाडीवर आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी