शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 19:02 IST

Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Lok Sabha ( Marathi News ) :लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन करण्यात टीडीपी आणि जेडीयू या पक्षांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ खासदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे असणार या चर्चा सुरू आहेत. टीडीपी'ने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे हे पद भाजपा आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षही लोकसभा अध्यक्षपदाची निवडणुकीत आपला उमेदवार देऊ शकते, असं बोलले जात आहे. यामुळे आता अध्यक्षपदावरुन सस्पेंन्स वाढला आहे. 

Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. २६ जून रोजी लोकसभा आपल्या नवीन सभापतीची निवड करेल. त्यामुळे विरोधी पक्षही सभापतींच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करू शकतात, असे बोलले जात आहे. विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद न दिल्यास ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊ शकतात. यासंदर्भातील अंतिम निर्णय संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेण्यात येऊ शकतो.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी सुरू होईल आणि ३ जुलै रोजी संपेल. ९ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन खासदार शपथ घेतील. दरम्यान, राज्यसभेचे २६४ वे अधिवेशन २७ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

नवे खासदार शपथ घेणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाची ओळख करून देणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करतील. २३० हून अधिक सदस्यांसह विरोधी पक्षांची दीर्घकाळातील सर्वात मोठी ताकद आहे आणि लोकसभेत ९९ खासदार असलेला काँग्रेस आधीच शेअर बाजार घोटाळा आणि NEET परीक्षेतील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून सरकारवर हल्ला करत आहे. त्यामुळे संसदेचे आगामी अधिवेशन गदारोळात जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी