शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएच्या बैठकीत मोदींनी पवन कल्याण यांचं केलं खास कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:34 IST

Lok Sabha Election 2024: आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी (Narenda Modi) यांनी मागच्या सरकारचा कार्यकाळ, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या घटना आणि भविष्यातील योजना याबाबतत सविस्तर भाष्य केलं. यावेळी मोदींनी एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांचा आवर्जुन उल्लेख केला. त्यात त्यांनी अभिनेते आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांचंही विशेष कौतुक केलं. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळालं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून स्वबळावर सरकार चालवणाऱ्या भाजपाचं बहुमत हुकल्याने नव्या सरकारच्या स्थापनेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपा आणि एनडीएमधील घटक पक्षांकडून आजच सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दरम्यान, आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी मागच्या सरकारचा कार्यकाळ, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलेल्या घटना आणि भविष्यातील योजना याबाबतत सविस्तर भाष्य केलं. यावेळी मोदींनी एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांचा आवर्जुन उल्लेख केला. त्यात त्यांनी अभिनेते आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांचंही विशेष कौतुक केलं. 

आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतात भाजपा आणि एनडीएने मिळवेल्या यशाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, दक्षिण भारतातील आमच्या कामगिरी कामगिरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच एक जागा जिंकली. तामिळनाडूमध्ये आम्ही खातं उघडू शकलो नाही. मात्र आम्ही लढत दिली. तर आंध्र प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आमचे सहकारी चंद्राबाबू म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये एवढा मोठा विजय आधी कुणालाही मिळाला नव्हता. दरम्यान, इथे मंचावर पवन कल्याणही दिसत आहेत. हे पवन नाहीत, तर वादळ आहे, असा कौतुकास्पद उल्लेखही नरेंद्र मोदी यांनी केला. 

दरम्यान, यंदाच्या लोकसभा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये एनडीएनं मोठं यश मिळवलं आहे. एनडीएनं आंध्र प्रदेशमधील लोकसभेच्या २५ जागांपैकी २१ जागा जिंकल्या आहेत. त्यात तेलुगू देसम पक्षाने १६, भाजपाने ३ आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने २ जागांवर विजय मिळवला आहे. तर आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये तेलुगू देसम पक्षाने १३५, जनसेना पक्षाने २१ आणि भाजपाने ८ जागांवर विजय मिळवला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालandhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jansena Partyजनसेना पार्टीBJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी