शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 18:10 IST

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकांसाठी कामाला लागले आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून भाजपाने लोकसभेची सेमी फायनल जिंकली. अशातच काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. दरम्यान, पंजाबकाँग्रेसने आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांच्यासोबत पक्षाचे नेते राजा वाडिंग यांच्या चंदीगड येथील घरी बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभेसाठी आघाडीसोबत जाण्यास आपण तयार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी हरीश चौधरी यांच्या कानावर घातले. 

काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेस राज्यातील सर्व १३ जागा स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या बैठकीत राजा वाडिंग यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा, सुखजिंदर रंधवा, परगट सिंग यांचीही उपस्थिती होती. खरं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता असून 'आप' इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. 

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी आम्हाला पंजाबमध्ये कोणत्याही आघाडीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीत असून स्वबळावर आम्ही मैदानात उतरू. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सरकारशी लढण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये आमची कोणावरही विश्वासार्हता नाही आणि आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आल्याचे पंजाब काँग्रेसच्या प्रभारींनी सांगितले.

तेलंगणा वगळता काँग्रेसच्या हाती निराशापाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती, मात्र तेथील जनतेने आपली परंपरा कायम राखत अपेक्षेप्रमाणे सत्ताबदल केला आणि सत्तेच्या चाव्या भाजपाकडे सोपवल्या. मात्र, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजपाला सत्ता कायम राखण्यात यश आले. छत्तीसगडच्या निकालाने मात्र राजकीय पंडितांना देखील धक्का दिला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. पण, तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर यांच्या पक्षाचा पराभव करत सत्ता काबीज केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPunjabपंजाबcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी