शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:42 IST

Lok Sabha Election 2024: अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या (Congress) तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर देताना दिसत आहे. मात्र प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य आणि सुधारणेसाठीच्या संभाव्य मार्गांबाबत विचारण्यात आले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जेव्हा आपल्यामध्ये काही तरी उणीव आहे आणि सुधारणेची गरज आहे, अशी जेव्हा एखाद्याला जाणीव होते, तेव्हाच सुधारणा होऊ शकते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये मानसिक अज्ञान, बौद्धिक आळ आणि अहंकार भरलेला आहे. तसेच पक्ष अजूनही याच पद्धतीने मार्गाक्रमण करत आहे. 

याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, हे असं आहे की, आपण योग्य मार्गावर आहोत, असं एखाद्याला वाटतं, मात्र ते काय करत आहेत हेच त्यांना बऱ्याचदा समजत नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीमागे आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे भारतीय राजकारणात सध्या काय चाललंय आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करण्याची आवश्यक आहे, हेच त्यांना माहिती नाही आहे, असं परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं. 

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये अज्ञानता, आळस आणि अहंकार यांचं एकत्रिकरण झालं आहे.  लोक त्यांना मत का देत नाही आहेत, हेच काँग्रेसला कळत नाही आहे. दुसरी बाब म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला हे समजत आहे मात्र ते एवढे आळशी आहेत की ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर तिसरी बाब म्हणजे काँग्रेसमधील अहंकार असू शकतो. त्यामुळे लोक सध्या आपल्याला मतदान करत नसतील, तरी कधी ना कधी लोकांना आपल्या चुकीची जाणीव होईल आणि शेवटी ते काँग्रेसला मतदान करतील, असं काँग्रेसला वाटत आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर