शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:32 IST

Lok Sabha Election 2024 And Congress : अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी झालं. परंतु अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उत्तर प्रदेश, रायबरेली आणि अमेठी या व्हीव्हीआयपी लोकसभा जागांसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार यावर अजूनही सस्पेंस आहे. याचदरम्यान, काँग्रेस नेते दीपक सिंह यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

अमेठी आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, काँग्रेस नेते दीपक सिंह म्हणाले की, "आम्हा सर्वांना विश्वास आहे की राहुल गांधी, प्रियंका गांधी येतील आणि भाजपाचा पराभव करतील." एकीकडे सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर रायबरेलीमध्ये चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान दिलं आहे. 

काँग्रेस रायबरेलीतून कोणाला तिकीट देणार?

सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवल्यानंतर रायबरेलीमध्ये त्यांच्या जागी कोण निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून रिंगणात उतरवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

20 मे रोजी होणार मतदान 

अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात होत्या, पण 2019 च्या निवडणुकीत स्मृती इराणींनी या जागेवर राहुल गांधींचा पराभव केला. तर काँग्रेसने या जागेवरील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि या जागेवरूनही ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात असे मानले जात आहे. अमेठीमध्ये उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख तीन मे आहे. अमेठी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. तर रायबरेलीच्या जागेवरही 20 मे रोजी मतदान होणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस