शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:21 IST

Lok Sabha Election 2024: "संदेशखलीतील आरोपीला तृणमूलने वाचवण्याचा प्रयत्न केला. बंगालमध्ये टीएमसी सरकार रामाचे नावही घेऊ देत नाही."

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज(12 मे 2024) पश्चिम बंगालमधील (West Bengal) च्या बराकपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, CAA, राम मंदिर आणि आरक्षणाबाबत राज्यातील जनतेला 5 गॅरंटी दिल्या. 

आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, "आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती देता येईल का? मित्रांनो, टीएमसी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी तुष्टीकरणाचे राजकरण करते. येथील तृणमूल आमदाराने हिंदूंना भागीरथीमध्ये बुडवू, असे म्हटले होते. कुणाच्या जीवावर ते एवढी हिंमत करतात? यांनी बंगालमध्ये हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले. तुष्टीकरणासाठी ते एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताहेत." 

संदेशखलीचा मुद्दा..."संदेशखलीतील आरोपीला तृणमूल काँग्रेसने वाचवण्याचा प्रयत्न केला. टीएमसीचे गुंड संदेशखलीतील माता-बहिणींना धमकावत आहेत. कारण काय, तर अत्याचार करणाऱ्याचे नाव शहाजहान शेख आहे. आज परिस्थिती अशी आहे की, बंगालमध्ये टीएमसी सरकार रामाचे नावही घेऊ देत नाही. सरकार रामनवमी साजरी करण्यास परवानगी देत ​​नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या लोकांनीही राम मंदिराविरोधात आघाडी उघडली आहे, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. तसेच, राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या.

पीएम मोदींच्या पाच गॅरंटी

  1. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही."
  2. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत कोणीही CAA रद्द करू शकणार नाही."
  3. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही."
  4. "जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही."
  5. "जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि OBC यांचे आरक्षण संपणार नाही."

काँग्रेसवर जोरदार टीकायावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस कुटुंबाने 50 वर्षे सरकारे चालवले, परंतु काँग्रेसच्या राजवटीत पूर्व भारतात फक्त गरिबीत होता. बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश..काँग्रेस आणि इंडियातील पक्षांनी पूर्व भारताला मागास सोडले. 2014 मध्ये आम्हाला संधी दिली अन् आम्ही देशाच्या पूर्व भागाला विकसित भारताचे ग्रोथ इंजिन बनवले," अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका