शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक 2024 : भाजपाचे 17-18 फेब्रुवारीला 'महामंथन', हजारो नेत्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 21:59 IST

या बैठकीसाठी सुमारे दहा हजार नेते सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप 'महामंथन' करणार आहे. येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील हजारो नेत्यांना बोलावण्यात आले असून, या सभेत पीएम मोदी 'विजयाचा मंत्र' देणार आहेत.

भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय परिषदेच्या सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत खासदार (राज्यसभा आणि लोकसभा), आमदार, विधान परिषद सदस्य, माजी खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. त्यात सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय पदाधिकारीही सहभागी होतील.

तसेच, भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, कोअर कमिटीचे सदस्य, शिस्तपालन समिती, वित्त समिती, निवडणूक समिती, माजी प्रदेशाध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय बैठकीत लोकसभा क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारी, लोकसभा निमंत्रक आणि लोकसभा विस्तारक यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 

याशिवाय, पक्षाचे सर्व राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे मुख्य प्रवक्ते, राज्य माध्यम समन्वयक, राज्य सोशल मीडिया, आयटी समन्वयक, आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस, सेलचे राज्य समन्वयक, देशभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, राज्यस्तरीय मंडळे आणि महामंडळांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष यांनाही बैठकीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला जाईलया दोन दिवसीय बैठकीसाठी दहा हजारांहून अधिक नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. याशिवाय मोदी सरकारच्या कामगिरीवर ठराव मांडण्यात येणार आहे. राम मंदिर, कलम 370 यांसारख्या मुद्द्यांवर आश्वासने पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारबद्दल आभार प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण