शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

भाजप लढणार ४४५ जागांवर, मित्रपक्षांची संख्या ४० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 06:49 IST

Lok Sabha Election 2024 : १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत 'कमळ' स्वबळावर

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४४० ते ४४५ जागा लढविण्याची शक्यता आहे. पक्षाने आतापर्यंत ४०५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि अन्य काही राज्यांतील काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे. 

महाराष्ट्रातील २५ उमेदवारांची नावे पक्षाने घोषित केली असून, आणखी किमान सहा नावे येत्या काही दिवसांत घोषित केली जाऊ शकतात.भाजपने स्वतःचे ३७० जागांचे आणि रालोआचे ४०० जागांचे विजयी लक्ष्य गाठण्यासाठी जवळपास सर्वच राज्यांत छोट्या पक्षांसोबत युती केली असून, मित्रपक्षांची संख्या ४० वर गेली आहे. याशिवाय ओडिशात बिजदसोबत, हरयाणात जेजेपीसोबत व पंजाबमध्ये अकाली दलासोबत युती करण्यासाठी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.

एवढेच नाही तर रालोआला भक्कम करण्यासाठी पक्षाने काही ईशान्य राज्यांतील जागांवरील आपला दावा सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात अधिकाधिक पक्षांना सोबत घेऊन मोठ्या सुधारणा घडवून आणू इच्छितात. त्यामुळे ते काही जागांवर पाणी सोडत असल्याचे अंतर्गत गोटातील सूत्रांनी सांगितले. याच कारणामुळे भाजप नेतृत्व प्रसंगी पक्ष कार्यकत्यांच्या भावना दुखावून छोट्या- मोठ्या सर्व पक्षांतील नेत्यांचे पक्षात स्वागत करत आहे. पक्षाने मंत्र्यांसह १०० हून अधिक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

मित्रपक्षांची संख्या वाढली२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या वेळी अधिक पक्षांसोबत युती केली आहे. भाजपच्या मित्रपक्षांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या असेल.२०१९ मध्ये भाजपला आंध्र प्रदेशात २ भोपळाही फोडता आला नव्हता. या वेळी तेथे पक्षाचे खाते उघडावे म्हणून एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षासोबत युती करण्यात आली आहे. या युतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी जोर लावला होता.तेलंगणामध्ये अन्य राज्यांप्रमाणेच भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. २०१४ मध्ये भाजपने ४२८ उमेदवार उभे केले आणि २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ४३७ उमेदवार उभे करून ३०३ जागांवर विजय मिळवला होता.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४