शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहंनी दाखल केली उमेदवारी; म्हणाले- 'मोदीजी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:02 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या 7 मे रोजी इथे मतदान होणार आहे.

Amit Shah Nomination: आज देशातील 102 लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. एकीकडे मतदानाची धुम सुरू आहे, तर दुसरीकडे अनेक उमेदवार पुढील टप्प्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील आज, शुक्रवारी (19 एप्रिल) गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील: अमित शाहअर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, 'आज मी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर मतदारसंघाचे मतदार आहेत. शिवाय लालकृष्ण अडवाणी, अटल बिजारी वाजपेयी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मी गेली 30 वर्षे या मतदारसंघातून आमदार आणि खासदार राहिलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.'

'या निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने संपूर्ण नावलौकिक मिळवले आहे. यूपीए सरकारने निर्माण केलेली पोकळी भरण्यासाठी जनतेने आम्हाला 10 वर्षे दिली, आता पुढील 5 वर्षात विकसित भारताचा पाया घालायचा आहे. मी देशातील मतदारांना आवाहन करतो की, प्रचंड बहुमताने सर्वत्र कमळ फुलवा.' गांधीनगर लोकसभा जागेसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे.

अमित शाह यांचा रोड शो आणि रॅली अमित शाह गांधीनगरमध्ये तीन रोड शो आणि रॅलीला संबोधित करणार आहेत. पहिला रोड शो अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद शहरात तर दुसरा गांधीनगर जिल्ह्यातील कलोल शहरात होणार आहे. यानंतर अहमदाबाद शहरात तिसरा रोड शो होईल. रोड शो केल्यानंतर शाह अहमदाबाद शहरातील वेजलपूर भागात निवडणूक रॅलीला संबोधित करतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी