शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 19:13 IST

अद्याप India आघाडीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष (AAP) अॅक्टिव्ह झाला आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरुच मतदारसंघातून आपला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा यांना आपने भरुच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, अद्याप INDIA आघाडीतील जागांचे वाटप झालेले नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत. बर इंडिया आघाडीतील पक्षाने उमेदवार जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जनता दल युनायटेड (JDU) ने अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुची तांगुक, यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे.

तुरुंगात आहेत चैत्रा वसावा गुजरातमधील नेत्रंग येथे एका सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज मी जाहीर करतोय की, चैत्र वसावा आम आदमी पार्टीच्या वतीने भरुच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसावा यांना जामीन मिळाला नाही, तर ते तुरुंगातीन लोकसभेची निवडणूक लढवतील." गुजरातमधील डेडियापाडा येथील आप आमदार चैत्रा वसावा वन विभागाशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात आहेत.

'भाजप दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहे'यावेळी भाजपवर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपच्या सांगण्यावरुन अटक केली. ते मला धाकट्या भावासारखे आहेत. सर्वात दुःखाची बाब म्हणजे वसावा यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. डाकूंचाही धर्म होता, पण भाजपवाले त्या डाकूंपेक्षाही वाईट आहेत. चैत्र वसावा वाघ आहेत, त्यांना फार काळ पिंजऱ्यात ठेवता येत नाही," असं केजरीवाल म्हणाले. 

कोण आहेत चैत्रा वसावा?चैत्राभाई दामजीभाई वसावा डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. जानेवारी 2023 मध्ये त्यांची गुजरात विधानसभेत AAP चे विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे कथित खंडणी आणि वन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वसावा तुरुंगात आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी