शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत, प्रकरण सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 09:09 IST

लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या वापराचे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या वापराचे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालातील मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यात तफावत असल्याचा आरोप करत एका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) असे ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या संस्थेचे नाव आहे.

 कुठल्याही निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी मतांच्या आकडेवारीचा योग्य ताळमेळ घालण्यात यावा, असे निवडणुक आयोगाला आदेश देण्याची विनंती या संस्थेने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निकलामधील आकडेवारीत झालेल्या गोंधळासंबंधीच्या सर्व प्रकरणांचा तपास करण्यात यावा, अशी विनंती या संस्थेने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाकडून संकेतस्थळ आणि अ‍ॅपवरील आकडेवारीत करण्यात आलेला बदल हा मतदान प्रक्रियेतील फेरफार लपवण्याचा केलेला प्रयत्न तर नाही ना असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्यांसोबत तज्ज्ञांच्या एका पथकाने विविध निवडणूक क्षेत्रातील एकूण मतदान आणि मतमोजणीतील मतदानाची आकडेवारी यांची पडताळणी केली आहे. ही पडताळणी २८ मे आणि ३० जून रोजी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावरील आकडेवारी आणि माय व्होटर्स टर्नआऊट अ‍ॅपवरील आकडेवारी यावरून करण्यात आली आहे.

या दोन्ही आकडेवारीवरून एकूण ५४२ मतदारसंघांपैकी ३४७ मतदारसंघातील मतदान आणि मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत होती. तसेच ही तफावत एका मतापासून १ लाख १ हजार ३२३ मतांपर्यंत होती, असे या याचिकेत म्हटले आहे. तर सहा मतदारसंघ असे होते. जिथे विजयाच्या अंतरापेक्षा मतदानाच्या आकडेवारीतील तफावर अधिक होती. एकूण मतदानामध्ये ७ लाख ३९ हजार १०४ मतांची तफावत आढळून आली, असेही याचिकेत म्हटले आहे.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दाखल केलेल्या आपल्या याचिकेमधून निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच २०१९ च्या निवडणूक निकालांची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपले संकेतस्थळ आणि माय व्होटर टर्नआऊट  अ‍ॅप या अ‍ॅपवरील मतदानाची आकडेवारी बदलण्यात आल्याचा दावा  याचिकाकर्त्यांनी केला आहे.  

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल