शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा, तृणमूल काॅंग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:11 IST

अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून संपूर्ण देशात निवडणुकीचे वारं वाहू लागलंय. देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  मात्र अल्पसंख्याकाच्या रमजान महिन्यात मतदानाची तारीख येणार असल्याने यावर प्रश्न उपस्थित राहू लागलेत. 

रमजानचा रोजा सुरु होणाऱ्या असल्याने मतदान टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो. ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होईल. याचा फटका सर्वाधित उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीच्या काही भागात पडू शकतो. ५४३ लोकसभा जागांपैकी १६९ जागांवरील मतदान प्रक्रियेत याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी केला आहे. 

फिरहाद हकीम म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्ही त्याचा सन्मान राखतो, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही काही भाष्य करू शकत नाही. मात्र निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना रमजान महिन्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणं गरजेचे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्ष्यणीय आहे. रमजानचा रोजा ठेऊन मुस्लिम मतदारांना मतदान करणे शक्य होणार नाही. अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप त्यांनी केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रमजान महिन्यात होणाऱ्या मतदान तारखा बदलण्याची मागणी केली. 

रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी होणार असून दुसरा टप्पा 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल, चौथा टप्पा 29 एप्रिल, पाचवा टप्पा 6 मे, सहावा टप्पा 12 मे तर शेवटचा टप्प्यात 19 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा केली जाईल. यानंतर देशात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाtmcठाणे महापालिकाMuslimमुस्लीमElectionनिवडणूकPoliticsराजकारण