शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

Lok Sabha Election 2019: ...म्हणून 'ही' दीड कोटी मतं ठरणार खास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:14 PM

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या 1.9 कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार  देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील, असे निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी जाहीर केले.

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या 1.9 कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते. त्यासाठी, अद्यापही आयोगाकडून मतदार नोंदणीप्रकिया सुरू आहे. गत 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 81.5 कोटी मतदारांची नोंदणी झाली होती. मात्र, मतदानापर्यंत हा आकडा वाढला होता. 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 89.7 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 46.5 कोटी पुरुष तर 43.2 कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच 33,109 मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, 16.6 लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे. 

सन 2014 च्या निवडणुकांवेळी 83 कोटी मतदारांची नोंदणी होती. त्यामध्ये 44 कोटी पुरुष आणि 40 कोटी महिलांचा समावेश होता. तिसऱ्या प्रवर्गात 28,527 मतदार सहभागी होते. तर, 13.6 लाख नोकरदार जे पोस्टल मतदार होते. दरम्यान, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांतील नवमतदारांची तुलना केल्यास गत 2014 मध्ये नवमतदारांची संख्या जास्त होती. 2014 मध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या 2.3 कोटी होती, जी यंदा 1.6 कोटी असणार आहे. त्यामुळे या तरुण मतदारांचा कौल आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही महत्त्वाचा ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा