शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'चौकीदार' देशातील वातावरण बिघडवत आहे : जया बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:20 IST

चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे.

लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी निशाणा साधला आहे. देशामधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चौकीदार करत आहे. फक्त माझीच नाहीतर जनतेची सुद्धा हीच भावना झाली आहे, असा टोला जया बच्चन यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना लागवला. लखनौ येथे समाजवादी पक्षाच्या  उमेदवार पूनम सिंन्हा यांच्या प्रचारसभेच्या वेळी त्या बोलत होत्या.

चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. देशामध्ये चौकीदाराची भूमिका महत्वाची असते. परंतु सद्या जो चौकीदार आहे. तोच देशामधील वातावरण बिघडवण्याचा काम करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला.

जया बच्चन यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्ता आणि मतदार यांना संबोधित करताना म्हणाल्या की , तुम्ही सगळे जण पूनम सिन्हा यांना विजयी करण्याचे मला वचन द्या. नाहीतर त्या मला मुंबईमध्ये जाण्यास मज्जाव करतील. पूनम ह्या माझ्या चांगल्या मैत्रीण असून माझे त्याच्याशी मागील ४० वर्षापासून चांगले संबंध आहेत. असेही जया म्हणाल्या.

आपण सर्वांनी मिळून नविन उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी केले पाहिजे. तुम्ही सगळे जण मोठ्या संख्येने मतदान करावे. आता जो उत्साह मला दिसत आहे. तसाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवा. यावेळी, समजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची जया बच्चन यांनी आपल्या भाषणातून प्रशंसाही केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJaya Bachchanजया बच्चनAkhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदी