शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'भारतात सत्तांतर झाल्यास...', इस्राईलच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:19 IST

मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली - इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. भारतात सत्तांतर झाल्यानंतरही इस्राईल आणि भारताच्या संबंधांनर काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान अद्याप व्हायचे आहे, मात्र सत्तांतरासंदर्भाती इस्राईलच्या राजदुतांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारत आणि इस्राईल यांच्यातील राजकीय संबंध समान मूल्य आणि एका विशिष्ट दृष्टीकोनावर अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात उभय देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील. भारतात एनडीए सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले तरी उभय देशातील संबंधावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं मल्का यांनी म्हटले. तसेच संबंधांत बदल करण्यासाठी काहीही कारण दिसत नाही. हे दोन्ही देशांतील संबंध असून सत्तेत कोण आहे, याला महत्त्व नसल्याचे मल्का यांनी सांगितले.

मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भारतातील लोकसभा निवडणुकीवर जगाचे लक्ष लागले आहे. देशातील दोन टप्प्यांतील मतदान बाकी असून मोदी सरकारकडून सत्ता मिळविण्यासाठी पू्र्ण प्रयत्न करण्यात येत आहे. तर विरोधक देखील प्रखर झुंज देत आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतरच देशात कुणाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIsraelइस्रायल