शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

गौतम गंभीरकडे २ तर सुनिता केजरीवाल यांच्याकडे ३ मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:24 IST

सुनिता केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा,गाझियाबाद आणि उत्तर कोलकाताच्या या तीन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप खुराना यांनी केला आहे. दुसऱ्याला बोट दाखवण्याच्या आधी स्वतः आधी बरोबर आहे का याची खात्री करावी असा टोला सुद्धा हरीश खुराना यांनी लगावला.

मुंबई - पूर्व दिल्लीमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यावर दोन मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप आम आदमी पक्षाकडून  करण्यात आले होते. दुसरीकडे भाजपने पलटवार करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांच्याकडे तीन मतदार ओळखपत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून  करण्यात आलेले आरोप त्यांच्यावर उलटताना दिसत आहे.

गंभीर यांच्या विरोधात उभा असलेल्या आम आदमी पक्षाच्या  उमेदवार आतिशी मर्लेना यांनी न्यायालयात धाव घेत गंभीर यांच्याकडे २ मतदार ओळखपत्र असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली होती. दिल्लीचे भाजप प्रवक्ते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे पुत्र हरीश खुराना यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नीकडे तीन मतदार ओळखपत्र असल्याचे ट्वीट केले आहे.

 

सुनिता केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा,गाझियाबाद आणि उत्तर कोलकाताच्या या तीन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप खुराना यांनी केला आहे. दुसऱ्याला बोट दाखवण्याच्या आधी स्वतः आधी बरोबर आहे का याची खात्री करावी असा टोला सुद्धा हरीश खुराना यांनी लगावला.

एका पेक्षा जास्त मतदार ओळखपत्र असणे गुन्हा आहे. यात एक वर्षासाठी शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे एकापेक्षा जास्त ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्यास याची माहिती निवडणुक आयोगाला देऊन एकाच ठिकाणी नाव ठेवणे अपेक्षित असते. मात्र गौतम गंभीर आणि सुनिता केजरीवाल यांनी तसे केले नाही त्यामुळे आता निवडणुक आयोग याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGautam Gambhirगौतम गंभीरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी