Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:26 AM2019-03-12T06:26:15+5:302019-03-12T06:26:42+5:30

आम आदमी पक्षाशी आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय

Lok Sabha Election 2019: Congress will contest seven seats in Delhi on its own | Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आमचा पक्ष दिल्लीत लोकसभेच्या सर्व सातही जागा स्वबळावर लढवणार असल्याचे व आम आदमी पक्षाशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे सांगून सोमवारी सगळ्या चर्चा व अफवांना पूर्णविराम दिला.

काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश अध्यक्ष शीला दीक्षित यांची भूमिका मान्य करून गांधी यांनी स्वत:च्या आणि दिल्ली प्रदेशचे प्रभारी पी. सी. चाको यांच्या सूचनेचा बळी दिला. येथील इंदिरा गांधी इन्डोर स्टेडीयममध्ये ‘मेरा बूथ, मेरा गौरव’ अंतर्गत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही आपापल्या बूथवर जाऊन लोकांना सांगा की देशाचा विकास काँग्रेसच करू शकतो, आप नाही आणि भाजपादेखील. आता बूथ कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी दिल्लीतील सर्व सातही जागांवर काँग्रेस उमेदवारांना विजयी बनवावे.
तत्पूर्वी, राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका करताना पुन्हा म्हटले की, चौकीदार चोर आहे. त्यावर हजारों कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’, असे म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन सांगावे की, मोदी यांनी जे दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते ते रोजगार कुठे आहेत? अजहर मसूद याला कोणी सोडले, अजित डोवाल यांची मसूदला सोडण्यात काय भूमिका होती? मोदी यांची खिल्ली उडवताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांचे बूट, शर्टस आणि मोबाईलच्या मागे लिहिलेले असते ‘मेड इन चायना’ आणि ते प्रचार करतात ‘मेक इन इंडिया’चा. राहुल यांनी या संमेलनातून देशाला याचे संकेत द्यायचा प्रयत्न केला की काँग्रेस जे बोलेले ते करील.

Web Title: Lok Sabha Election 2019: Congress will contest seven seats in Delhi on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.