शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 14:21 IST

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे.

ठळक मुद्देकेजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आणि मोदी-अमित शहा जोडीवर शरसंधान केलं आहे.अरविंद केजरीवाल हे मोदी सरकारविरोधी महाआघाडीत सहभागी झाले आहेत.मोदी-शहांना पराभूत करणं हे प्रत्येक देशभक्त व्यक्तीचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ मार्चपासून उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच, केजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आणि मोदी-अमित शहा जोडीवर शरसंधान केलं आहे. या दोघांना पराभूत करणं हे प्रत्येक देशभक्त व्यक्तीचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतात द्वेषाचं वातावरण निर्माण करून इथल्या शांततेचा भंग करण्यासाठी पाकिस्तान ७० वर्षं प्रयत्न करत होता. त्यांना जे जमलं नाही, ते मोदी-शहांनी पाच वर्षांत केलंय, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे मोदी सरकारविरोधी महाआघाडीत सहभागी झाले आहेत. महाआघाडीतील सर्वच पक्षांवर त्यांनी काही वर्षांपूर्वी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. परंतु, मोदी सरकार पाडण्यासाठी ते त्यांच्यासोबत जात आहेत. मोदी आणि अमित शहा मिळून देशातील लोकशाही संपुष्टात आणत असल्याचा आरोप त्यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.  आज देशात भीतीचं वातावरण आहे. जाती आणि धर्माच्या आधारे जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. जोवर देशात शांतता प्रस्थापित होत नाही, तोवर विकास शक्य नाही. त्यामुळे मोदी-शहांना सत्तेपासून रोखणं हा आपला धर्मच आहे, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. हे पुन्हा सत्तेत आल्यास देशात निवडणुकाच बंद करतील, राज्यघटना बदलून टाकतील, हिटलरप्रमाणे हुकूमशाही सुरू होईल, असा हल्ला त्यांनी चढवला. 

दिल्लीतील जनतेनं भाजपा आणि काँग्रेसला सर्वच्या सर्व जागा देऊन पाहिल्या, पण दोघांपैकी कुणीच दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकलं नाही. यावेळी मतदारांनी आम आमदी पार्टीला संधी देऊन पाहावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा