शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ममता दिदींनी शहांच्‍या सभा आणि हेलिकॉप्‍टर लँडिंग परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:29 IST

भारतीय जनता पक्षाचे अध्‍यक्ष अमित शहा यांच्‍या पश्‍चिम बंगालमधील जाधवपूर येथील सभेस परवानगी नाकारली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात १९ मे रोजी मतदान पार पडत आहे. त्यापूर्वी,पश्‍चिम बंगालमधील राजकरण तापत असल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्‍यक्ष अमित शहा यांच्‍या पश्‍चिम बंगालमधील जाधवपूर येथील सभेस परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच त्‍यांचे हेलीकॉप्‍टर लँड करण्‍यास देखील परवानगी नाकारली आहे.

लोकसभा निवडणुकीच्‍या सातव्‍या टप्‍प्‍यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये मतदान होणार आहेत. हा मतदानाचा शेवटचा टप्‍पा असल्‍याने सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी चांगलीच मेहनत घेतली जात असल्याचे चित्र आहे. अमित शहा जाधवपूर येथे आज रोड शो करणार होते. मात्र त्‍यांच्‍या या रोड शोस परवानगी देण्‍यात आली नसल्याची माहिती भाजपने दिली आहे. सुरक्षेचे कारण सांगत ही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

 

याआधी देखील ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्‍यांच्‍या सुरक्षेचे कारण सांगत रोड शो करण्‍यास व  हेलिकॉप्‍टर लँडिंगला परवानगी नाकारली होती. यापूर्वी २२ फेब्रुवारीला ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्‍या मालदा येथील रॅलीच्‍या दरम्‍यान त्‍यांच्‍या हेलीकॉप्टर लँडिगला परवानगी नाकारली होती. भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मात्र , ममता यांनी यासाठी परवानगी दिली होती.

अमित शहा आज पश्‍चिम बंगालच्‍या दौर्‍यावर आहेत. पश्‍चिम बंगालमधील तीन ठिकाणी त्‍यांच्‍या सभा आयोजित केल्‍या आहेत. अमित शहा यांची जयनगर,जाधवपूर व बरासत या तीन लोकसभा मतदारसंघात सभा होणार होत्या.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल