शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Lok Sabha Results 2019 : यावेळी 76 महिला संसदेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 10:31 AM

याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही.

मुंबई - यावेळी झालेली लोकसभा निवडणूक विविध कारणांनी ऐतिहासिक ठरली आहे. मात्र, यातील एक वेगळे कारण म्हणजे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीत 76 महिला खासदार म्हणून संसदेत जाणार आहे. देशातील 542 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 724 महिलांनी निवडणूक लढवली होती,यातील 76 ठिकाणी महिला उमेदवार ह्या निवडून आल्या आहेत. याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही.

लोकसभा निवडणुकीत महत्वाच्या सर्वच पक्षांनी महिलांना नेहमीपेक्षा अधिका जागांवर संधी दिली होती. भाजपने 53 तर कॉंग्रेसने 54 महिला उमेदवार लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे अपक्ष आणि इतर राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा महिला उमेदवार मैदानात उतरवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता देशात ७६ जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत, देशातील सर्वधिक महिला उमेदवार देणारा राज्य म्हणून पश्चिम बंगाल ठरला आहे. बंगाल मधील एकूण 42 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील, 14 महिला उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. यात, टीएमसच्या 11 तर भाजपकडून 3 महिलांना खासदार पदाची संधी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 महिला उमेदवार ह्या विजयी ठरल्या आहेत. त्यातील 9 महिला खासदार भाजपकडून तर कॉंग्रेसकडून एकट्या सोनिया गांधी ह्या महिला खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत.

ओडीसा मध्ये सुद्धा 8 महिलांना यावेळी संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. यात बीजेडीने 21 जागांपैकी 7 ठिकाणी महिलांना संधी दिली होती. यातील 6 ठिकाणी त्यांना यश मिळाले आहे. तर, भाजपच्या 2 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. देशात यावेळी महिला खासदार यांची संख्या ऐतिहासिक ठरली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWomenमहिलाParliamentसंसद