शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी बांगलादेशी अभिनेता? भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:29 IST

भाजपा नेता जे. पी. मजुमदार यांनी कोलकाता निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.  

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद यांना मैदानात उतरविले आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी(भाजपा)कडून करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपाने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी भाजपा नेता जे. पी. मजुमदार यांनी कोलकाता निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.  

भाजपा नेत्याने सांगितले की, 'नियमानुसार देशातील निवडणुकीत कोणताही विदेशी नागरिक भाग घेऊ शकत नाही. जर तृणमूल काँग्रेस आपल्या प्रचारासाठी बांगलादेशी नागरिकांचा वापर करत आहेत, तर त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत आहे. त्या विदेशी नागरिकाला व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली पाहिजे.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील राजगंज मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कन्हैयालाल अग्रवाल यांच्या प्रचारार्थ बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद करताना दिसून आले. यावरुन पश्चिम बंगालमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा