लोकसभेत भाजपा-तृणमूल भिडले

By Admin | Updated: July 9, 2014 02:21 IST2014-07-09T02:21:33+5:302014-07-09T02:21:33+5:30

मंगळवारी लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही़ तृणमूल काँग्रेसने रेल्वे अर्थसंकल्पाला केलेला विरोध आज नारेबाजी, शिवीगाळ आणि यानंतर हातघाईर्पयत पोहोचला

In the Lok Sabha, the BJP-Trinamool contested | लोकसभेत भाजपा-तृणमूल भिडले

लोकसभेत भाजपा-तृणमूल भिडले

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
मोदी सरकारचे अभूतपूर्व बहुमत आणि या तुलनेत दुभंगलेला शक्तिहीन विरोधक याउपरही संसदेत सुरूअसलेल्या गोंधळामुळे  मंगळवारी लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही़ तृणमूल काँग्रेसने रेल्वे अर्थसंकल्पाला केलेला विरोध आज नारेबाजी, शिवीगाळ आणि यानंतर हातघाईर्पयत पोहोचला आणि अखेर मार्शलांना पाचारण करण्याइतपत वेळ येऊन ठेपली़यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल़े
दरम्यान, लोकसभेत भाजपाच्या एका सदस्याने आपल्या सदस्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करीत आपल्या महिला सदस्यांविरुद्ध अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप तृणमूलने केला आह़े रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी 2 वाजून 1क् मिनिटाला लोकसभेचे कामकाज सुरूहोताच, या संघर्षाला तोंड फुटल़े तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी अलीकडे सरकारने जाहीर केलेली रेल्वेभाडेवाढ तसेच रेल्वे अर्थसंकल्प मागे घेण्याची मागणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली़ याला विरोध करीत भाजपा सदस्यांनी ‘अब की बार मोदी सरकार’च्या घोषणा सुरू केल्या़ ही घोषणाबाजी सुरूअसतानाच भाजपाचे दोन सदस्य तृणमूल काँग्रेस कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा आरोप लावीत, अध्यक्षांच्या आसनासमोर आल़े या ठिकाणी दोन्ही पक्षात शिव्या, घोषणाबाजी अशी खडाजंगी उडाली़ 
 
 ते खासदार दारू प्यायलेले?
4नवी दिल्ली : लोकसभेत आम्ही शांततेत विरोध नोंदवत असताना, भाजपाचे एक खासदार आपल्या अन्य पक्ष खासदारांसह आमच्या दिशेने चालून आले आणि आम्हाला शिवीगाळ करू लागल़े मला पूर्ण विश्वास आहे की ते खासदार दारू प्यायलेले होते, अशी संतप्त प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे शताब्दी रॉय यांनी नोंदवली़

 

Web Title: In the Lok Sabha, the BJP-Trinamool contested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.