शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
5
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
6
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
7
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
8
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
9
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
10
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
11
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
12
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
13
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
14
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
15
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
16
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
17
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
18
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
19
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
20
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?

अतिशय क्रूर पद्धतीने लॉकडाऊन झाले; राजीव बजाज यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:12 IST

उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले, अशी कडक टीका ख्यातनाम उद्योगपती राजीव बजाज यांनी केली. देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी बजाज यांनी हे मत व्यक्त केले.

राजीव बजाज यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही.

उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.राजीव बजाज म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी आहेत. या निर्णयामुळे देशाचे दुहेरी नुकसान झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही व अर्थव्यवस्थेचेही कंबरडे मोडले आहे. भारतामध्ये झाले त्या पद्धतीने जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले नाही, असे त्या देशांत राहाणाऱ्या माझ्या नातेवाईक, मित्रमंडळींनी कळविले आहे. जागतिक महायुद्धांच्या काळातही अशा वाईट पद्धतीने लॉकडाऊन अमलात आले नव्हते.

सरकारविरोधात बोलल्यास कोसळते संकटराजीव बजाज म्हणाले की, एखाद्या घटनेचा नामवंत लोकांना तडाखा बसतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो; परंतु आफ्रिकेमध्ये ८ हजार मुले भुकेने तडफडून मरतात, तिथे कोणाचेही लक्ष जात नाही. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो स्थलांतरित मजूर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले. हे मजूर बेकार झाले होते. त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न. या स्थलांतरितांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठीच राजीव बजाज यांनी आफ्रिकेतील मुलांच्या उदाहरणाचा सूचकतेने वापर केला. ते म्हणाले की, देशातील उद्योगजगतच नाही, तर सर्वसामान्य माणसेही केंद्र सरकारला वचकून राहातात. या सरकारविरोधात काही बोललो, तर आपल्यावर संकट कोसळेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. अशी स्थिती असूनही मी माझ्या मनातील विचार अत्यंत मोकळेपणाने मांडण्याचा निर्णय घेतला.

लोकांच्या मनातील भीती घालवाप्रख्यात उद्योगपती राजीव बजाज यांनी सांगितले की, सर्वात प्रथम लोकांच्या मनातून भीती घालविली पाहिजे. या गोष्टीवर सर्वांनीच मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे. मला वाटते देशातील जनता पंतप्रधानांचे ऐकते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असून, या आजाराला घाबरू नका, असे आता सरकारने लोकांना सांगण्याची गरज आहे. जगातील अनेक देशांनी जे आर्थिक पॅकेज जाहीर केले, त्यातील दोनतृतीयांश रक्कम जनतेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र, भारतात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील फक्त १० टक्के रक्कमच लोकांच्या हाती पडणार आहे.)

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा