शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Lockdown News: ५ वर्षीय मुलाचा एकट्याने विमानप्रवास; तब्बल ३ महिने होता आईपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:20 IST

लॉकडाऊनमुळे एक ५ वर्षाचा मुलगा आपल्या आईपासून गेल्या ३ महिन्यापासून दूर होता. आईकडे जाण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.

ठळक मुद्देआजपासून देशातंर्गत विमान प्रवास करण्यास परवानगी सोशल डिस्टेंसिंग आणि सुरक्षेचे नियम पालन करण्याचं आवाहन लॉकडाऊनमुळे तब्बल ३ महिने मुलगा आजी-आजोबांकडे अडकला होता.

दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक जण आपल्या घरापासून बाहेर अडकले आहेत. देशात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत असताना लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. मात्र या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणत देशातंर्गत विमान वाहतूक सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक जण आपापल्या घरी परतत आहेत.

लॉकडाऊनमुळे एक ५ वर्षाचा मुलगा आपल्या आईपासून गेल्या ३ महिन्यापासून दूर होता. आईकडे जाण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. अशावेळी देशातंर्गत विमान वाहतूक सुरु झाल्यानंतर दिल्लीहून या ५ वर्ष मुलाने एकट्याने कर्नाटकपर्यंत विमान प्रवास केला. विहान शर्मा असं या ५ वर्षाच्या मुलाचं नाव आहे. गेल्या ३ महिन्यापासून तो दिल्लीत त्याच्या आजी-आजोबांच्या घरी अडकला होता.

५ वर्षाच्या विहानने दिल्ली ते बंगळुरू एकट्याने विमान प्रवास केला. बंगळुरु एअरपोर्टला पोहचल्यानंतर त्याची आई त्याला नेण्यासाठी आली होती. एअरपोर्टला पोहचल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी आई-मुलाची भेट झाली. पण त्यावेळी आईने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुलाची गळाभेट घेणे टाळले. आतापर्यंत कर्नाटक विमानतळावर दोन फ्लाईट्स लँडिंग झाल्या आहेत. त्यातील एका फ्लाईटमधून विहान बंगळुरुला परतला आहे.

दरम्यान, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी रविवारी सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था राज्यांना करावी लागेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यात कोविड-१९ची लक्षणे आढळल्यास राज्ये त्यांची स्वत:ची क्वारंटाईन किंवा आयसोलेशन व्यवस्था तयार करू शकतात.

आजपासून विमानसेवा सुरू होत असून नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे नियम व मार्गदर्शन रविवारी जाहीर केले. विमान उड्डाणांसाठी नियम सगळ््या प्रवाशांनी फेसमास्क वापरले पाहिजे त्यांनी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगचे उपाय राज्यांनी योजले पाहिजेत, विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानक अशा सर्वच महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणांचे नियमित सॅनिटायझेशन झाले पाहिजे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशनबाबत केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 31 जुलैपर्यंत वाढवली वैधता

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद शिगेला; रात्री २ वाजता ट्विट करत पियूष गोयल म्हणाले...

उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार?; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन!

जाणून घ्या, ४८ तासांनंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास; नासा पुन्हा सुरु करणार ‘मानव मिशन’!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमान