शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:31 IST

अत्यावश्यक सेवांची वाहनेच रस्त्यावर; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा परिणाम

- भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांनाही ब्रेक लागला आहे. अत्यावश्यक सेवांचा परवाना दिलेली वाहनेच रस्त्यावर धावत असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महानगरांमध्येही शुकशुकाट असल्याने रस्ते अपघातांची किरकोळ नोंद झाली आहे.जसे लॉकडाऊन जाहीर झाले आहे तसे देशात रस्ते अपघातांचे प्रमाण नगण्य झाले आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. रस्ते सामसूम असल्याने या वाहनांच्या रहदारीला कुठलाही अडथळा नाही. त्यामुळेच रस्ते अपघात होत नसल्याचे दिसून येत आहे. देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी होते तिथे आता रस्त्यावर चिटपाखरूही नसल्याचे दिसून येत आहे.देशात सर्वाधिक रस्ते अपघात हे राजधानी दिल्लीत होतात. सरासरी पाच जणांचा दिल्लीत बळी जातो, अशी सरकारी नोंद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने हे प्रकार प्रामुख्याने घडतात, असे दिल्ली वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.१५ ते ३१ मार्चदरम्यान दिल्लीत केवळ १९ रस्ते अपघातांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४८ एवढी होती. राजधानीत गेल्या २० दिवसांतही तुरळक अपघात झाले आहेत. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. असेच चित्र अन्य महानगरांमध्येही आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या काही अत्यल्प अपघातांची नोंद आहे त्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांचा वाहन धडकल्याने बळी गेला आहे.कोणत्या वर्षी किती अपघात?2017 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात ४ लाख ६४ हजार ९१० तर २०१८ मध्ये ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले.2018 मध्ये रस्ते अपघातात १ लाख ५१ हजार ४७१ जणांचा बळी गेला. देशभरातील रस्त्यांमध्ये १.९४ टक्के हे राष्ट्रीय महामार्ग तर २.९७ टक्के हे राज्य महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसाधारणपणे ३० टक्के अपघात होतात, तर मृतांचे प्रमाण ३५.७ टक्के एवढे आहे, तर राज्य महामार्गावर हीच स्थिती २५.२ टक्के अपघात आणि २६.८ टक्के मृत्यूदर एवढी आहे.95.1 टक्के रस्त्यांवर तब्बल ४५ टक्के अपघात होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता तेथील मृतांची संख्याही ३८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ टक्के हे पादचारी असतात. २.४ टक्के हे सायकलस्वार, तर ३६.५ टक्के दुचाकीस्वार असतात. १८ ते ४५ वय असलेले ६९.६ टक्के जण हे रस्ते अपघातात ठार होतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात