कोलकात्याजवळ लोकल ट्रेनमध्ये स्फोट

By Admin | Updated: May 12, 2015 09:06 IST2015-05-12T09:06:03+5:302015-05-12T09:06:22+5:30

पश्चिम बंगालमधील टिटागढ येथे लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली असून यात १७ प्रवासी जखमी झाले आहेत.

A local train exploded near Kolkata | कोलकात्याजवळ लोकल ट्रेनमध्ये स्फोट

कोलकात्याजवळ लोकल ट्रेनमध्ये स्फोट

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. १२ - पश्चिम बंगालमधील टिटागढ येथे लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या स्फोटात किमान १७ जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. गावठी बॉम्बच्या मदतीने हे स्फोट घडवल्याचा अंदाज आहे. 

उत्तर २४ परगना जिल्ह्यातील टिटागढ रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेननमधील इंजिनपासून पाचव्या डब्यात स्फोट झाला. पहाटे ३ वाजून ५५ मिनीटांनी हा स्फोट झाला होता. ही ट्रेन सियालदाह येथून कृष्णानगर येथे जात होती. दोन गटांमधील पूर्ववैमनस्यातून हा स्फोट घडवण्यात आला असावा असा संशय आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.  

Web Title: A local train exploded near Kolkata