सुकमा हल्ल्यात स्थानिक नक्षलवादी नेत्यांचा सहभाग
By Admin | Updated: December 3, 2014 01:28 IST2014-12-03T01:28:39+5:302014-12-03T01:28:39+5:30
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दलातील अनेक नक्षल्यांची शरणागती व त्यांना झालेली अटक याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठका घेतल्याचे सांगण्यात आले

सुकमा हल्ल्यात स्थानिक नक्षलवादी नेत्यांचा सहभाग
रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या (सीआरपीएफ) १४ जवानांचा बळी घेतलेल्या हल्ल्याची आखणी व नियोजन हे तेथील स्थानिक नक्षलवादी नेत्यांच्या संगनमताने झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. बस्तरच्या दक्षिण भागात काही दिवसांपासून हे नेते मुक्कामाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दंडकारण्य भागातील काही कट्टर नक्षलवादी नेत्यांनी दक्षिण बस्तर-सुकमा, बिजपौर नारायणपूरच्या जंगलात बैठका घेतल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दलातील अनेक नक्षल्यांची शरणागती व त्यांना झालेली अटक याबाबत विचारविमर्श करण्यासाठी या बैठका घेतल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या मदतीने झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३८ लाख रायपूर : सोमवारच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या १४ जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३८ लाख व जखमींना प्रत्येकी ६५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केली़
दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नक्षली हल्ल्याचा निषेध केला आहे. तर रा. स्व. संघाने हल्ल्याला भ्याड कृत्य असे संबोधून त्याचा निषेध केला आहे. (वृत्तसंस्था)