स्थानिक स्वराज्य संस्थावरील ताबा
By Admin | Updated: September 29, 2014 07:07 IST2014-09-29T07:07:52+5:302014-09-29T07:07:52+5:30
जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा केंद्रबिंदू़ मिनी मंत्रालय म्हणून या संस्थेची ओळख आहे़ राज्यातील २७ जिल्हा परिषदांपैकी ९ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे़

स्थानिक स्वराज्य संस्थावरील ताबा
जिल्हा परिषद : जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा केंद्रबिंदू़ मिनी मंत्रालय म्हणून या संस्थेची ओळख आहे़ राज्यातील २७ जिल्हा परिषदांपैकी ९ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे़ जिल्हा परिषद सदस्यांची एकूण संख्या १,६३९ असून यापैकी ४५८ जागा काँगे्रसच्या ताब्यात आहेत़ सिंधुदुर्ग़, कोल्हापूऱ, वर्धा, बुलडाणा़, नांदेड़, उस्मानाबाद, लातूऱ, धुळे़, वाशिम, औरंगाबाद आदी जिल्हा परिषदांवर काँग्रेसची सत्ता आहे़
पंचायत समिती : राज्यात ३०९ पंचायत समिती कार्यरत आहेत़ तालुका पातळीवरील या सत्ता केंद्राच्या एकूण ३२४८ जागांपैकी ८६४ जागांवर काँग्रेसच्या सदस्यांनी विजय मिळविला आहे़
महानगरपालिका
राज्यात एकूण २६ महानगरपालिका कार्यरत आहेत़ त्यापैकी ७ (अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, मालेगांव, चंद्रपूर, नांदेड) महापालिकेवर काँग्रेसचा महापौर आहे. यातील सोलापूर, नांदेड आणि लातूर ही शहरे काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि स्व. विलासराव देशमुख यांचा गड आहेत.