केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. "मुद्रा योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली. ही कर्ज कोणी घेतली जावयानं का?," असं म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.राज्यसभेतील चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिलं. "ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत युपीआयद्वारे एकूण ३.६ लाख कोटी रूपयांचं ट्रान्झॅक्शन झालं आहे. युपीआयचा श्रीमंत व्यक्ती करत नाहीत. त्याचा वापर मध्यमवर्गीय व्यक्ती आणि छोटे व्यापारी करतात. ही लोकं कोण आहे. सरकारनं कोणाच्या जावयासाठी युपीआय तयार केलं नाही," असंही त्या यावेळी म्हणाल्या.
Rajya Sabha : मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 18:24 IST
Rajya Sabha : जावई हा काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही, प्रत्येकाच्या घरी असतो, सीतारामन यांचा टोला
Rajya Sabha : मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल
ठळक मुद्देजावई हा काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही, प्रत्येकाच्या घरी असतो, सीतारामन यांचा टोलासरकारनं जावयासाठी युपीआय तयार केलं नाही, सीतारामन यांचं वक्तव्य